कोकण पदवीधर मतदार संघ  निवडणूक – 2024           

          जाहीर आवाहन 

मी खोटे आश्वासन देऊन निवडणूक जिंकणार नाही, मी प्रस्थापित राजकारणी व घराणेशाची यांच्याविरुद्ध निवडणूक लढत आहे  

नमस्कार पदवीधर मतदार बंधू – भगिनींनो,  

मी अमोल अनंत पवार, 

वाणिज्य शाखेचा आणि पत्रकारिता शाखेचा पदवीधर आहे, 

माझी ओळख  : मी भारतीय पदवीधर प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य ( रजि.) या संघटनेचा अध्यक्ष असून मी गेली 13 वर्षांपासून  पदवीधर प्रतिष्ठानच्या माध्यमातून पदवीधरांच्या  न्याय, हक्कासाठी राज्यशासन, लोकसेवा आयोग, मुंबई विद्यापीठाकडे विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करीत आहे. राज्यात कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर व सर्व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकेची मतदार नोंदणी ऑनलाईन सुरु करण्यासाठी मी सर्वप्रथम पाठपुरावा केला आणि यंदा प्रथमच कोकण व मुंबई पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन सुरु झाली. मी राज्यातील  श्रमिक पत्रकारांना पेन्शन योजना सुरु करण्यासाठी, मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र विध्यार्थ्यांना त्यांच्या शहराजवळ निर्माण करण्यासाठी, एमपी एस सी संदर्भात सूचना,आरोग्य सुविधा,तरुणांसाठी रोजगार अशा विविध मागण्या शासनाकडे करून माझा पाठपुरावा सुरु आहे.  

मी कोकण पदवीधर मतदार संघात आमदार झाल्यावर राज्यात पदवीधरांसाठी स्वतंत्र पदवीधर महामंडळाची स्थापना होईल.   

स्वतंत्र पदवीधर महामंडळाची स्थापना करावी याबाबत मी राज्य शासनाकडे सर्वप्रथम मागणी केली आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराजजी चव्हाण,तत्कालीन मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस,तत्कालीन मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे, सध्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यां सर्वांकडे अनेकदा मागणी केली आहे.पदवीधर महामंडळ स्थापन झाल्यास पदवीधरांचे प्रश्न, रोजगार व स्वयं रोजगार,सवलतीच्या दरात उच्चं शिक्षण, परदेशातील शिक्षण,फी मध्ये सवलत, देशात व परदेशात नोकरीचे प्रश्न सुटतील, उद्योग धंद्यासाठी वित्त संस्थेकडून सवलतीच्या दरात कर्जाची सुविधा कमी वेळात उपलंब्ध होईल.याबाबतच्या पदवीधर महामंडळाच्या संकल्पनेची मागणी  मी राज्य शासनाकडे केली आहे. हा शासनाचा धोरणात्मक निर्णय असल्याने  मी एका वर्षात या महामंडळाची स्थापना करणार 

मी कोकण पदवीधर मतदार संघात आमदार झाल्यावर कोकणात सर्व जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार   

कोकणात पालघर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यातून रुग्णांना आरोग्याच्या सुविधेसाठी मुबंईत केईम रुग्णालय,जेजे रुग्णालय,सायन रुग्णालयात यावे लागेल,या प्रवासात दुर्दैवाने अनेक रुग्णांचे प्राण गमावले आहेत. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर कोकणात सर्व जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची सहा वर्षात निमिर्ती करणार  

मी कोकण पदवीधर मतदार संघातआमदार झाल्यावर कोकणातील मुंबई-गोवा हायवेचे काम पूर्ण करणार 

 कोकणातील विध्यार्थी तरुणाची नागरिकांची लाईफ लाईन असलेल्या मुंबई -गोवा हायवेचे काम गेली अनेक वर्षापासुन रखडलेले आहे. या हायवेच्या खड्यांमुळे अनके प्रवाशांचे अपघाती निधन तसेच काहींना अपंगत्व आले आहे. या हायवेचे काम पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाला जाग येण्यासाठी  मी भारतीय पदवीधर प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुंबई-गोवा हायवेवरील खड्डे स्पर्धेचे आयोजन केले होते..कोकणातील हा रस्ता मी एका वर्षात पूर्ण करणार 

मी कोकण पदवीधर मतदार संघातआमदार झाल्यावर कोकणातील  पदवीधरांना  १०० टक्के नोकरी  आणि उद्योगधंद्यासाठी कर्ज उपलब्ध करणार,एमपीएससीच्या रिक्त जागा १०० टक्के भरणार शासकीय भरतीचा १०० टक्के अनुशेष भरणार 

कोकणात ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यात एम आय डी सी मध्ये अनेक उद्योग धंदे बंद पडलेले आहेत.तर अनेक छोटे मोठे उद्योग धंदे हे बाजूच्या राज्यात स्थलांतरित झाले आहेत. कोकणात प्रत्येक जिल्ह्यात एम आय डी सी मध्ये नवीन उद्योगधंदे, नवीन विदेशातील आयटी  कंपन्या कोकणात आणून या मतदारसंघातील पदवीधर मतदाराच्या घरात एका व्यक्तीला रोजगार अथवा  उदयोगधंदयांसाठी  लाखो रुपयांचे कर्ज उपलब्ध करण्यासाठी शर्तीने प्रयत्न करणार.राज्यात गेली ७ वर्षांपासून स्पर्धा परीक्षेच्या, एमपीएससीच्या रिक्त जागा आहेत अनेक विभागात परीक्षा झाल्या आहेत मात्र वर्षानुवर्षे निकाल रखडलेला आहे, स्पर्धा परीक्षेची रिक्त पदे १०० टक्के भरल्या जात नाही. याचा जास्त फटका ग्रामीण भागातील तरुणांना बसला आहे. शासनातील कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द करून स्पर्धा परीक्षेच्या आणि एमपीएससीची रिक्त पदे १०० टक्के भरणार. 

मी कोकण पदवीधर मतदार संघातआमदार झाल्यावर शिक्षकांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करणार   

महाराष्ट्र राज्यात शिक्षकांचे वेतन, बदली निवृत्तीवेतन शिक्षण, भरतीप्रक्रिया या बाबत भेडसावणाऱ्या विविध प्रश्नासाठी राज्यात  शिक्षकांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करणार.

मी प्रस्थापित राजकारणी आणि घराणेशाही यांच्या विरोधात निवडणूक लढत आहे.मला आपल्या पाठबळाची गरज आहे. आपल्या परिवारातील भाऊ आपला मुलगा समजून मला आपले बहुमूल्य मत देऊन भरघोस मतांनी  विजयी करा. आपली सेवा करण्याची आणि पदवीधर मतदारांच्या विधायक मागण्या पूर्ण करण्याची संधी मला द्यावी ही आपणास तळमळीची विनंती. 

धन्यवाद …….   जय हिंद ….. ! जय महाराष्ट्र    ……  जय भीम …….. जय जवान ….     जय किसान  …… 

अपक्ष उमेदवार  श्री अमोल अनंत पवार  ( १) 

माझ्या नावासमोर I  क्रमांक लिहून मला प्रथम पसंतीचे मत देऊन बहुमताने विजयी करा

महात्मा फुले दीनबंधू राष्ट्रीय पुरस्कार विजेते -२०११

मतदान  : बुधवार  दि. २६ जून २०२४ वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत 

 

Search Your Name